Home अहमदनगर Anna Hazare: दुकान वाईन विक्रीविरोधात अण्णा करणार उपोषण

Anna Hazare: दुकान वाईन विक्रीविरोधात अण्णा करणार उपोषण

Anna Hazare to go on hunger strike

Parner | पारनेर: राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा उपोषण करण्याचा निर्णय इशारा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  (Anna Hazare) यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.

यासाठी राज्यातील विविध भागांत हजारे वेगवेगळ्या सामाजिक संघटनाबरोबर बैठका घेणार आहोत. राज्यातील बऱ्याच संस्था आणि संघटनांनी घेतलेल्या वाईनच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक संघटना आमच्या संपर्कात आहेत. लवकरच राज्यातील अशा संस्था आणि संघटनानी कोणत्याही पक्षाच्या विरोधात आंदोलन न करता समाज राज्य आणि राष्ट्रहिताचा विचार करून अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करावे. आंदोलनाची दिशा काय असावी आंदोलन कुठे कारणासाठी राज्यातील काही संस्था आणि संघटना विविध विभागात घेण्याचा विचार करीत आहे असे म्हंटले आहे.

अण्णा म्हणाले, सरकारच्या सुपर मार्केट वाईन विक्रीच्या निर्णयामुळे मुलांवर गंभीर परिणाम होतील. मुले हीच खरी आपली संपती आहे. या बालाकांमधुनच उद्याचे महापुरुष निर्माण होणार आहे. युवाशक्ती ही राष्ट्शक्ती आहे. प्रत्येक परिवाराचे उज्वल भविष्य ज्या मुलीना युवतींना घडवायचे आहे त्यांच्यावर या वाईनच्या या वातावरणाचा परिणाम होऊ शकतो. एकूणच या निर्णयाचा समाजावर काय परिणाम होतील याचा विचार राज्य सरकारने केलेला नाही. फक्त मिळणाऱ्या महसुलाचा विचार केलेला दिसतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.   

Web Title: Anna Hazare to go on hunger strike

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here