Home क्राईम संगमनेर: दरोड्याच्या तयारीतील आणखी एक टोळी जेरबंद

संगमनेर: दरोड्याच्या तयारीतील आणखी एक टोळी जेरबंद

Sangamner News: वाहने अडवून वाहनचालकांना हत्यारांचा धाक दाखवून लूटमार करत असणारे दरोडेखोर यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.

Another gang in preparation for robbery Arrested 

संगमनेर: संगमनेर तालुक्यात मागील आठवड्यात पावबाकी रोड येथे दरोड्याच्या तयारीत असणारी एक टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते. आता दुसरी कारवाई करत आणखी एक टोळी पकडण्यात आली आहे. वाहनचालकांना हत्यारांचा धाक दाखवून लूटमार करण्याच्या, दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना संगमनेर शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. १५) रात्री २:१५ वाजेच्या सुमारास बायपासजवळील संगमनेर तालुक्यातील समनापूर चौफुलीजवळ करण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गस्तीवर असलेल्या पोलिसांना पुणे बायपासजवळ पाच जण दोन दुचाकी वाहनांजवळ संशयास्पदरीत्या उभे दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले पुणे असता ते पळून जात असताना यातील चौघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्याजवळ छऱ्याची बंदूक, गज, गलोल, मिरचीपूड, लाकडी दांडा, स्क्क्रू ड्रायव्हर असे दरोडा टाकण्याचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले.

पकडलेल्या चौघांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता यातील तिघे विधिसंघर्षित बालके असल्याचे समोर आले आहे. गणेश चंद्रभान गायकवाड (वय २३, रा. खांडगाव, ता. संगमनेर) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा पाचवा साथीदार रवींद्र राधाकिसन डेंगळे हा पळून गेला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता रात्रीच्या वेळी वाहने अडवून वाहनचालकांना हत्यारांचा धाक दाखवून लूटमार करणार असल्याची कबुली पकडलेल्या चौघांनी दिली. अधिक चौकशी पोलीस करीत आहे.

Web Title: Another Gang in preparation for Robbery Arrested 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here