Home अहमदनगर अहमदनगर: महिलांचे अश्लील फोटो काढणारा जेरबंद

अहमदनगर: महिलांचे अश्लील फोटो काढणारा जेरबंद

Breaking News | Ahmednagar: महिलांचे अश्लील फोटो अज्ञात व्यक्ती काढून, ते व्हायरल, तरूणांकडून युवकाला चांगलाच चोप.

Arrested for taking obscene photos of women

पाथर्डी: महिलांचे अश्लील फोटो काढून सोशल मीडियावर टाकणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली आहे.

बुधवारी पाथर्डीच्या आठवडे बाजारात एक युवक आपल्या मोबाईलमध्ये महिलांचे अश्लील फोटो घेत असल्याची बाब बाजारातील काही दुकानदारांच्या लक्षात आली. तेथील तरुणांनी त्या युवकाला पकडून चांगलाच चोपले. त्यानंतर पोलिसांनी – तात्काळ त्या युवकाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविला. त्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला, आपण हे कृत्य केल्याचे त्याने कबूल केले. त्याचा मोबाईल फोन पोलिसांनी तपासला असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक महिलांचे अश्लील फोटो आढळून आले. युवकावर – कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, मोबाईलमध्ये काढण्यात आलेले ते सर्व फोटो पोलिसांनी डिलीट केले.

पाथर्डी शहरात राहणारा हा युवक अनेक दिवसांपासून महिलांचा पाठलाग करून, त्यांचे विचित्र पद्धतीचे व अश्लील फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढत होता. ते अश्लील फोटो इंस्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे ऑन्टी लव्हर ९०७ नावाच्या अकाऊंटवर व्हायरल करत होता. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांचे अश्लील फोटो अज्ञात व्यक्ती काढून, ते व्हायरल करत असल्याचे यापूर्वीच बाजारातील व्यापाऱ्यांच्या लक्षात आले होते. मागील काही दिवसांपासून त्याचा शोध घेण्यासाठी नागरिक व पोलिस यंत्रणा आरोपीच्या मागावर होते. अखेर घाणेरडे कृत्य करणारा युवक बुधवारी नागरिकांना मिळून आला. त्यावेळी नागरिकांनी त्याला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

Web Title: Arrested for taking obscene photos of women

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here