Home अहमदनगर अहमदनगर: पोलीस ठाण्याच्या आवारात महिलने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर: पोलीस ठाण्याच्या आवारात महिलने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

Attempt to commit suicide by taking the poisonous drug on the premises of a police station

Ahmednagar | अहमदनगर:  पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा राग मनात धरून एका महिलेने कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षा गणेश काटकसर वय २२ रा. माळीवाडा अहमदनगर असे आत्महत्याचा प्रयत्न  करणाऱ्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत.  

याप्रकरणी संबंधित महिलेविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस नाईक वंदना काळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक काळे या रविवारी ठाणे अंमलदार म्हणून ड्युटीवर असताना आश्विनी संतोष राऊत (वय 26 रा. गोधंळे गल्ली, माळीवाडा) या पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी गौरव शिंदे व वर्षा काटकर यांच्याविरूध्द, त्रास देतात म्हणून तक्रार दिली होती.

पोलिसांनी शिंदे व काटकर यांच्याविरूध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. दरम्यान तक्रार दिल्यानंतर आश्विनी राऊत तेथून निघून गेल्या. यानंतर दुपारी वर्षा काटकर तेथे आली. आश्विनी राऊतने दाखल केलेल्या गुन्ह्याचा राग मनात धरून तसेच आश्विनी विरूध्द काय कारवाई केली, असे म्हणून पोलीस ठाणे समोरील मोकळ्या जागेत विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या महिलेला तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. तिच्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Web Title: Attempt to commit suicide by taking the poisonous drug on the premises of a police station

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here