तलवारीचा धाक दाखवून हॉटेल बळकाविण्याचा प्रयत्न, सहा जणांवर गुन्हा
शिर्डी: तलवारीचा धाक दाखवत हॉटेल बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दि. १४ एप्रिल रोजी दुपारी साडे बारा वाजता घडली.
या गुन्ह्यात सहभागी असलेले अविनाश अशोक शिंदे व विनोद पवार या दोघांना अटक केली आहे. चार जण अद्याप फरार आहेत.
याबाबत हॉटेल मालक बापूराव गायके यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हंटले आहे की, राहता तालुक्यातील शिर्डी लगत असलेल्या माझ्या मालकीचे असलेले हॉटेल साईतेज हे अविनाशी अशोक शिंदे याला सहा हजार रुपये महिन्याला असे भाड्याने दिले आहे. त्याच्याकडे ४२ हजार रुपये भाडे बाकी आहे. मात्र मागणी करूनही पैसे देण्यास टाळाटाळ कारत हॉटेल खाली न करता शिंदे व त्याच्या पाच मित्रांनी एकत्र येत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन माझ्याकडून बोगस नोटरी करून सह्या घेतल्या. तसेच चार हजार पाचशे रुपये व एटीएम काढून घेण्यात आले. त्यांना विरोध केला असता तलवार मानेला लावून जीवे मारण्याची धमकी देऊन हॉटेल बळकाविण्याचा प्रयत्न केला.
Web Title: Attempt to grab the hotel by showing fear of sword