Home संगमनेर संगमनेर: उपसरपंचाचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

संगमनेर: उपसरपंचाचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Sangamner News: कृषीपंपांना सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याच्या कारणातून साकूर येथे महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर जांबूत येथील उपसरपंचाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा (self-immolation) प्रयत्न.

Attempted self-immolation by pouring petrol on the sub- sarpanch's body

संगमनेर: कृषीपंपांना सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याच्या कारणातून तसेच आंदोलन करून महावितरण अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने अखेर मंगळवारी (दि. २९) संगमनेर तालुक्याच्या पठार भागात साकूर येथे महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर जांबूत येथील उपसरपंचाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी शेतकऱ्यांनी साकूर येथे महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी महावितरणचे अधिकारी आंदोलनस्थळी आले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या जांबूत गावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

जांबूत, खैरदरा, धनगरवाडा, नांदूर आदी गावच्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी जांबूत गावाचे उपसरपंच डोंगरे हे ६ एप्रिल रोजी शेतकऱ्यांसोबत संगमनेर येथील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना विद्युत वाहिनीचे काम पूर्ण करून विद्युत पुरवठा सुरळीत करू असे लेखी आश्वासन दिले होते.

चार महिने उलटूनही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. मंगळवारी सकाळी वाजता त्यांनी शेतकऱ्यांसोबत साकूर महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. त्यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. एकही अधिकारी उपस्थित न झाल्याने डोंगरे यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी तेथे उपस्थित असलेले घारगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे, पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश लोंढे आदींनी त्यांना ताब्यात घेतले.

Web Title: Attempted self-immolation by pouring petrol on the sub- sarpanch’s body

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here