Home संगमनेर संगमनेर: संकेत नवले खून प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर

संगमनेर: संकेत नवले खून प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर

Sangamner Murder Case: खून प्रकरणी मोठा गाजावाजा करून व मोठ्या शिताफीने तपास करून अटक केलेल्या दोन्ही आरोपींना भक्कम पुराव्याअभावी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर.

Bail granted to accused in Sanket Navale murder case

संगमनेर:  येथील संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी संकेत नवले (रा. अकोले) याच्या खून प्रकरणी मोठा गाजावाजा करून व मोठ्या शिताफीने तपास करून अटक केलेल्या दोन्ही आरोपींना भक्कम पुराव्याअभावी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. त्यामुळे संशयित आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असून संगमनेर पोलिसांना अद्यापही संकेतच्या मारेकऱ्यांना शोधण्यात यश आलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच खरे आरोपी सापडत नसल्याने दोन तरूणांना बळीचा बकरा केला जात असल्याच्या संशयित आरोपींच्या आरोपाला बळ मिळाले आहे.

अकोले येथील रहिवासी असलेला संकेत नवले हा विद्यार्थी संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. ८ डिसेंबर २०२२ रोजी त्याचा मृतदेह शहरालगतच्या सुकेवाडी रस्त्यावर असलेल्या पुनर्वसन कॉलनी जवळ एका नाल्यात आढळून आला होता. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याच्या डोक्यात धारधार शास्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीसांना संकेतचे मारेकरी शोधण्यात अपयश येत असतानाच मयत संकेत हा लैंगिक संबंधाबाबतच्या मोबाईल अॅपच्या आधारे पोलिसांनी शहरालगतच्या पुनर्वसन कॉलनीमध्ये राहणाऱ्या शाहरुख आणि सलमानकडे वारंवार चौकशी करून या दोघांना अटक के ली. मात्र तपासात त्यांच्याविरुध्द कोणतेही सबळ पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली आहे. अॅड. शरीफ पठाण व अॅड. मोहसीन खान यांनी या दोघांची बाजू न्यायालयात मांडली. दरम्यान या खूनाचे रहस्य उलगडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यांनी हे आव्हान पेलून आरोपींना अटक केली.

मारेकरी शोधण्यात अपयश येत असतानाच मयत संकेत हा लैंगिक संबंधाबाबतच्या मोबाईल अॅपच्या आधारे पोलिसांनी शहरालगतच्या पुनर्वसन कॉलनीमध्ये राहणाऱ्या शाहरुख आणि सलमानकडे वारंवार चौकशी करून या दोघांना अटक के ली. मात्र तपासात त्यांच्याविरुध्द कोणतेही सबळ पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली आहे. अॅड. शरीफ पठाण व अॅड. मोहसीन खान यांनी या दोघांची बाजू न्यायालयात मांडली. दरम्यान या खूनाचे रहस्य उलगडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यांनी हे आव्हान पेलून आरोपींना अटक केली होती. परंतु पोलिसांना अद्यापही सबळ पुरावे गोळा करता आलेले नाही. त्यातच मयत व संशयित आरोपी जे अॅप वापरत होते ते परदेशी होते. त्यामुळे त्याचा पुर्ण डाटा मिळविणे पोलीसांना अवघड होऊन बसले आहे.

Web Title: Bail granted to accused in Sanket Navale murder case

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here