बाळ बोठे यांच्या अटकपूर्व जामिनावर ११ डिसेंबरला न्यायालयाची सुनावणी
अहमदनगर| Bal Bothe: सामाजिक कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रीग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाल बोठे यांच्या अटकपूर्व जामिनावर येत्या शुक्रवारी ११ डिसेंबरला जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे.
बोठे याने अटकपूर्व जामीन मिळावा यासंदर्भात सोमवारी न्यायालयात वकील महेश नवले यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी न्यायालयात प्राथमिक सुनावणी होऊन सरकारी वकील व पोलिसांचे म्हणणे मागितले आहे. सरकारी पक्षाचे म्हणणे आल्यावरच पुढील सुनावणी ११ डिसेंबरला होणार आहे.
जरे हत्याकांडात मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांचे नाव पोलीस तपासात समोर आहे. मात्र बोठे हे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.या हत्याकांडातील पाच आरोपी अटकेत आहेत. दोघांना न्यायालयीन कोठडी तर तिघे पोलीस कोठडीत आहेत.
Web Title: Bal Bothe pre-arrest bail hearing on December 11