Home संगमनेर दुध उत्पादक शेतकऱ्यांची परवड हे भाजप सरकारचे पाप आहे: थोरात

दुध उत्पादक शेतकऱ्यांची परवड हे भाजप सरकारचे पाप आहे: थोरात

संगमनेर: दुध उत्पादक शेतकऱ्यांची परवड ही भाजप सरकारचे पाप आहे. गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी  आणि देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या प्रचंड संघर्षामुळे नसताना त्यांना घ्यावा लागला. मात्र काही महिन्यातच पाच व तीन रुपये अनुदान देऊन नंतर ही योजना गुंडाळून टाकली असे थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात दुध भुकटी उपलब्ध असताना मोदी सरकारने १० हजार मेट्रिक टन दुध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुधाचे दर कमी होणारच. एकीकडे दुध पावडर मागायची आणि दुसरीकडे दुध पावडरसाठी अनुदान मागायचे असे दुटप्पी भाजपच करू शकते अशी टीकाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते. आता करोनाचे संकट असताना दुधाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांसमोर गंभीर असे संकट उभे राहिले आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Balasaheb Thorat affordability of milk-producing farmers Bjp govt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here