Home क्राईम अघोरी कृत्य; भानामती उतरवण्यासाठी पत्नीची सर्वांसमोर अंघोळ

अघोरी कृत्य; भानामती उतरवण्यासाठी पत्नीची सर्वांसमोर अंघोळ

Pune Crime: अघोरी पूजा घालून पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करण्याचे कृत्य पुण्यातल्या कात्रज आंबेगाव.

Bathing of wife in front of everyone to remove bhanamati

पुणे: सांस्कृतिक आणि विद्येचं माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये अघोरी पूजा घालण्याचे कृत्य घडले आहे.  पत्नीवर भानामती नष्ट व्हावी म्हणून अघोरी पूजा घालून पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करण्याचे कृत्य पुण्यातल्या कात्रज आंबेगाव येथे घडली आहे. या बाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पती शिवराज कोरटकर (वय ३६ रा. सदनिका क्री ९०३ कात्रज आंबेगाव, सासरे राजेंद्र कोरटकर वय ६४ सासू चित्रालेखा ६२ , मांत्रिक मौलाना बाबा जामदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती ,सासरे, सासूला पोलिसानी अटक केली असून मांत्रिक अजूनही फरार आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.

घरामध्ये सुख शांती नांदावी भरभराट व्हावी व पत्नी वरील भानामती नाहीशी व्हावी आणि पुत्र होण्यासाठी फिर्यादीला रायगडला नेवून सर्वांसमोर अंघोळ करायला लावली व एक ते दोन कोटी रुपये फिर्यादीकडून घेतले. हा सगळा प्रकार पुण्याच्या आंबेगाव परिसरात घडला आहे. फिर्यादी पत्नी हिला आरोपी पती यांनी संगनमत करून पत्नीचे शारीरिक व मानसिक शोषण करून वारंवार मारहाण करून शिवीगाळ केली. इतकंच नाहीतर फिर्यादीचे आई वडिलांनी लग्नामध्ये दिलेले सोन्याचे व चांदिचे दागिने पत्नीने पतिकडे विश्वासाने ठेवण्यास दिलेले असताना आरोपी पती यांनी ते परस्पर अपहार करून फिर्यादी यांचे फ्लॅटची कागदपत्रे परस्पर बँकेत ठेवून त्यावर बनावट स्वाक्षरी करून बँकेकडून ७५ लाख रुपये कर्ज घेवुन आरोपी पतीच्या व्यवसायामध्ये भरभराटी व्हावी घरामध्ये सुखशांती नांदावी व पत्नी यांचेवरची भानामती नाहीशी व्हावी. याकरिता हे कृत्य केल्याने पती, सासू, सासरे यांच्यावर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Bathing of wife in front of everyone to remove bhanamati

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here