Home क्राईम संगमनेर: एकास कोयत्याने मारहाण, दोघांवर गुन्हा

संगमनेर: एकास कोयत्याने मारहाण, दोघांवर गुन्हा

Sangamner Crime:  किरकोळ कारणावरून दोघांनी शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना.

Beating one with a crowbar, crime against two

संगमनेर : तीन महिन्यांपूर्वी चेहऱ्यावर लावण्यासाठी ट्यूब मागितली होती, त्यावेळी ट्यूब न दिल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एकाला शिवीगाळ व करत डाव्या हाताच्या कोपऱ्यावर कोयत्याने मारून दुखापत केल्याची घटना शनिवारी रात्री ११.४५ च्या सुमारास संगमनेर शहरातील बटवाल मळा परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरबाज शेख (रा. बटवाल मळा, संगमनेर) या २६ वर्षीय युवकाने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. उमेर मनसूर व्यापारी, इरफान मनसूर व्यापारी (दोघेही रा. बटवाल मळा, संगमनेर) या दोघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेख आणि व्यापारी हे एकमेकांचे जवळ राहतात. तीन महिन्यांपूर्वी उमेर व्यापारी याने शेख याच्याकडे चेहऱ्यावर लावण्यासाठी ट्यूब मागितली होती, मात्र त्यावेळी ट्यूब न दिल्याचा राग होता. त्यावरून शेख याला शिवीगाळ, दमदाटी करत उमेर व्यापारी याने त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर कोयत्याने मारून दुखापत केली, असे फिर्यादित म्हटले आहे. याबाबत पोलिस हेड कॉस्टेबल धनवट पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Beating one with a crowbar, crime against two

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here