Home क्राईम संगमनेर: युवकाला मारहाण, १५ जणांवर गुन्हा, विनयभंगाचा गुन्हा

संगमनेर: युवकाला मारहाण, १५ जणांवर गुन्हा, विनयभंगाचा गुन्हा

Sangamner Crime: युवकाला मारहाण करणार्‍या 15 जणांविरुद्ध गुन्हा, मुलीच्या वडीलाने शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाची (Molested) तक्रार, आठ जणांना अटक.

Beating youth, crime against 15 people, crime of molested

संगमनेर:  युवकाला मारहाण करणार्‍या 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे  तर यातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. संगमनेर शहरात शनिवारी हा प्रकार घडला होता. या हाणामारीत जखमी झालेल्या युवकाने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान या घटनेशी संबंधीत असलेल्या एका मुलीच्या वडीलाने शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद नोंदविली आहे.

याबाबत शहर पोलीस ठाण्यात मफाज मतीनखान पठाण (रा. कोल्हेवाडी रोड, संगमनेर) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपला मित्र मसीहुर याचे क्लास मधील नांदूर शिंगोटे परिसरात राहणार्‍या एका विद्यार्थिनी सोबत दोन-तीन महिन्यापूर्वी ओळख झाली होती. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मित्र सचिनकुमार कैलास महंतो (वय 18, रा. कोल्हेवाडी रोड) व माझी मैत्रीण असे तिघेजण मालदाड रोड परिसरातील एका कॅफेमध्ये बसलेलो होतो. यावेळी कॅफेच्या बाहेर काही युवक जमा झाले.

तुम्ही येथुन निघुन जा. असा निरोप दिल्याने मी व सचिन खाली कॅफेच्या बाहेर आलो. त्यावेळी कॅफे समोर असलेल्या अनोळखी मुलांनी आम्हास आमचे नाव विचारले. त्यावर आम्ही त्यांना आमचे नाव सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांचे मोटारसायकलवर मला व सचिन यास वेगवेगळे बसवून बळजबरीने विठ्ठलकडा येथे डोंगराजवळ नेले. नंतर आम्हास संबंधित युवती सोबत मैत्री केल्याचे कारणावरुन मारहाण केली. या ठिकाणी 10 व 15 लोक जमा झाले. त्यांनी मला संबंधीत समाजाच्या मुलींना घेऊन बसता का? असे म्हणुन त्यांचे हातातील लोखंडी रॉड, बेल्ट, हातातील कडयाने मला व माझा मित्र सचिन महंतो यास मारहाण करून गंभीर जखमी केले.

दरम्यान जमलेल्या लोकांपैकी एकाने माझा विवो वाय 83 प्रो कंपनीचा फोन बळजबरीने काढून घेतला. त्यानंतर त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत कुठे तक्रार केली तर तुम्हाला जिवे ठार मारु असा दम दिला. जखमी मफाज पठाण याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 10 ते 15 तरूणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 395, 363, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपासाला गती देत शहर व उपनगराच्या विविध भागातून करण संपत गलांडे (वय 21, रा. अभंगमळा), सोहम शेखर नेवासकर (वय 22, रा. गणेशनगर), ओंकार राजेंद्र जोर्वेकर (वय 19, रा. अकोले नाका), विश्वास सीताराम मोहरीकर (वय 21, रा. नेहरु चौक), संकेत बाबासाहेब सोनवणे (वय 21), अजीत अंकुश भरते (वय 24, दोघेही रा. कुंभार आळा), निशांत नंदू अरगडे (वय 21, रा. अरगडे गल्ली) व विक्रम खडकसिंग लोहार (वय 22, रा.घुलेवाडी) या आठ जणांना अटक केली आहे.

या घटनेतील मुलीच्या वडिलांनीही पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मफाज पठाण व त्याच्या एका मित्राने आपल्या मुलीचे कॉलेज सुटल्यानंतर तिचा पाठलाग करून तिच्या मोबाईल फोनवर फोन करुन अश्लील भाषेत बोलुन तिला त्रास दिला. दोन्ही आरोपींनी आपल्या मुलीला कोठेतरी नेण्याचे उद्देशाने त्यांनी तिला त्यांचेबरोबर असलेल्या मोटारसायकलवर बळजबरीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महाले या करत आहे.

Web Title: Beating youth, crime against 15 people, crime of molested

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here