Home अकोला प्रेयसी म्हणाली घरच्यांना सोड, अक्षयची नदीत उडी; पण ८ महिन्यांपासून थांगपत्ता नाही,...

प्रेयसी म्हणाली घरच्यांना सोड, अक्षयची नदीत उडी; पण ८ महिन्यांपासून थांगपत्ता नाही, तो अजूनही जिवंत?

Akola Crime: पूर्णा नदीच्या पुलावरून २५ वर्षीय तरुणाने नदीत उडी (Jump in the river), ना मृतदेह हाती लागला, ना त्या संदर्भात कुठली माहिती आली. अख्खं कुटुंब आजही अक्षयच्या प्रतीक्षेत.

Beloved said to leave the family, Akshay jumps in the river

अकोला: अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावरून २५ वर्षीय तरुणाने नदीत उडी घेतली. अक्षय गजानन ताथोड (वय २५ राहणार, मोठी उमरी, अकोला) असं नदीत उडी घेतलेल्या या तरुणाचं नाव आहे. हा प्रकार घडला होता ५ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास. मात्र अजूनही अक्षयचा शोध लागलेला नाही. आज ७ महिने २५ दिवस उलटले, तरीही अक्षयचा ना मृतदेह हाती लागला, ना त्या संदर्भात कुठली माहिती आली. अख्खं कुटुंब आजही अक्षयच्या प्रतीक्षेत आहे.

आई-वडिलांना सोड तेव्हाच लग्न करणार, अशी अट अक्षयच्या प्रेयसीने घातली होती. त्यानंतर सर्व काही सुरळीत सुरू होतं. मात्र, परत तिने लग्नाला नाही म्हटलं अन् रिलेशनशिपमध्येच राहायचं, असा हट्ट धरला. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे, अन् या वादातून अक्षयने मोठं  पाऊल उचललं. नदीच्या पुलावरून उडी घेत त्याने आपलं जीवन संपवलं. मात्र, अजूनही आपला मुलगा जिवंत असावा, असा विश्वास अक्षयच्या कुटुंबीयांना आहे.

अक्षयने ५ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अकोट-अकोला मार्गावर असलेल्या गांधीग्रामच्या पूर्णा नदीच्या पुलावर आपली मोटार सायकल उभी केली. त्यानंतर थोडा वेळ या परिसरात फिरला अन् थेट नदीत उडी घेतली, अशा चर्चा घटनास्थळी होत्या. मात्र अक्षयने नदीत उडी घेतल्याचं कुणीच पाहिलं नव्हतं.

या संदर्भात लागलीचं दहीहंडा पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि तात्काळ शोध बचाव पथकाला बोलवण्यात आले. शोध मोहीम सुरू झाली. अक्षयच्या शोधार्थ तब्बल १५ ते २० दिवस शोधमोहीम सुरू होती. अक्षय नदीत उडी घेतल्यानंतर नदीला दोन मोठे महापूर आले होते. तरीही मुक्ताईनगर येथील नद्यांच्या संगमापर्यंत ही शोध मोहीम राबवली. पण अक्षयचा शोध लागला नाही. त्यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली.

दरम्यान अक्षयच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयचं एका तरुणीवर प्रेम होतं. ८ ऑगस्ट २०२२ च्या दीड वर्ष आधीपासून ‘तो’ एका तरुणीच्या प्रेमात होता, अनेकदा त्यांच्या दोघांमध्ये वाद व्हायचा, वादाचं कारणही तेवढंचं असायचं. ते म्हणजे प्रेयसीने लग्नासाठी ठेवलेल्या अनेक अटी. प्रेयसीने अक्षयला म्हटलं होतं की आई-वडिलांबरोबर राहायचं नाही, बहिणींसह आई-वडिलांना सोडून दे, कारण तुझ्या आई-वडिलांनी तुझ्यासाठी काही कमावलं नाही, हे सर्व करणार तेव्हाच लग्नाला होकार देणार. असा हट्ट तरुणीने अक्षयसमोर धरला होता. त्यावेळी अनेकदा पोलिसांत लेखी स्वरुपात तक्रारी दाखल झाल्या. एकमेकांना लिहून देऊन लग्नालाही होकार झाला. मात्र, अचानक त्यांचात नेमका काय नवीन वाद झाला, अन् परत असं काय झालं की अक्षय याला एवढे मोठे पाऊल उचलावे लागले, हे सध्या गुपित आहे.

Web Title: Beloved said to leave the family, Akshay jumps in the river

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here