Home क्राईम पती आणि जाऊबाईचे अनैतिक सबंध: पत्नीने केली आत्महत्या

पती आणि जाऊबाईचे अनैतिक सबंध: पत्नीने केली आत्महत्या

Bhandara Crime Immoral relationship between husband and wife

गोंदिया | Bhandara Crime: जिल्ह्याच्या आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या ठाणा गावातील 30 वर्षीय दीपाली मेहर या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली. चार महिन्याआधीच धर्मेंद्र मेहर आणि दीपाली यांचा विवाह झाला होता. मात्र दिपालीची आत्महत्या नसून हत्या केला असल्याचा आरोप दिपालीच्या कुटंबीयांनी केला आहे. पोलिसांनी या घटनेला कारणीभूत असलेल्या पती धर्मेंद्र मेहर आणि दिपालीची जाऊबाई प्रीती मेहर या दोघांना अटक केली आहे.

प्राध्यापक धर्मेंद्र मेहर यांच्या पहिल्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने धर्मेंद्र यांनी चारच महिन्याआधी दीपाली गिरीपुंजे या महिलेशी लग्न केले. मात्र पत्नीच्या मृत्यू नंतर धर्मेद्र आणि त्यांची वहिनी प्रीती मेहर यांच्यात असलेले अनैतिक संबंध दीपालीला माहित झाले. यातूनच होणारा मानसिक त्रास होत असल्याने दिपालीने आपल्या घरच्या मंडळीला देखील याची माहिती दिली होती. (Immoral relationship between husband and wife)

चार दिवसाआधीच धर्मेंद्र हा दीपालीला तिच्या माहेरून घेऊन ठाणा गावात आला होता. दरम्यान दोघांमध्ये पुन्हा वाद व भांडण होत असल्याचे दिपालीने आपल्या माहेरी सांगितले होते. मात्र घरच्या मंडळीने दीपालीला फोन वर धीर देत होते. त्यानंतर दीपालीला राग अनावर झाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. असे दिपालीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे. याबाबत  पोलिसांनी तपास करत मृत दिपालीच्या कुटूंबियां कडून नोंदविलेल्या पोलिसांनी प्राध्यापक धर्मेंद्र मेहर आणि त्यांची वहिनी प्रीती मेहर याना अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Bhandara Crime Immoral relationship between husband and wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here