Home अकोले जाणून घ्या भंडारदरा, निळवंडे, आढळा धरणाचा पाणीसाठा

जाणून घ्या भंडारदरा, निळवंडे, आढळा धरणाचा पाणीसाठा

Akole News: सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० टी. एम. सी.च्या पुढे ढकलला.

handardara, Nilwande, Adhla Dam reservoir

अकोले: सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० टी. एम. सी.च्या पुढे ढकलला आहे.  भंडारदरा धरण उद्या तांत्रिकदृष्ट्या भरण्याची शक्यता आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 10127 दलघफू पाणीसाठा झाला आहे. धीम्या गतीने का होईना अजूनही पाण्याची आवक सुरूच असल्याने उद्या शनिवारी हे धरण तांत्रिकदृष्ट्या भरणार आहे. त्यानंतर येणारे पाणी पुन्हा प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

पाणलोटात पाऊस कमी झाल्याने मुळा धरणात नवीन पाण्याची आवकही मंदावली आहे. काल सायंकाळी 26000 दलघफू क्षमतेच्या धरणातील पाणीसाठा 18409 (71 टक्के) दलघफू झाला होता. काल सायंकाळी धरणात केवळ 3822 क्युसेकने आवक सुरू होती.

8330 दलघफू क्षमतेच्या निळवंडेतील पाणीसाठा काल सायंकाळी 6716 दलघफू (80.64 टक्के) झाला होता. रात्री उशीरा या धरणातील पाणीसाठा 81 टक्क्यांवर गेला होता. वाकी तलावही तुडुंब असून 197 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पाणलोटात अधूनमधून पाऊस होत असल्याने दोन्हीही धरणात नवीन पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरात 257, निळवंडेत 153 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. पाऊस वाढल्यास सध्या भंडारदरात 10500 दलघफू पाणी कायम ठेवण्याचे तर पाऊस कमी झाल्यास हे धरण पूर्ण क्षमतेने पूर्ण करण्याचे धोरण जलसंपदा विभागाचे आहे. गत 10 दिवसांपूर्वी या धरणातील पाणीसाठा 83-85 टक्के पाणीसाठा कायम ठेऊन येणारे पाणी नदीत सोडण्यात येत होते. पाऊस कमी झाल्यानंतर सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले. 1060 दलघफू क्षमतेच्या आढळा धरणात काल सायंकाळी 812 दलघफू (76.60टक्के) पाणीसाठा झाला होता.

Web Title: Bhandardara, Nilwande, Adhla Dam reservoir

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here