Home अहमदनगर दुचाकीवरून केलेल्या गोळीबारात युवक जखमी

दुचाकीवरून केलेल्या गोळीबारात युवक जखमी

Nevasa Bhenda youth was injured in the firing from the bike

भेंडा | Bhenda: भेंडा येथे पूर्वीच्या वादातून दुचाकीवरून केलेल्या गोळीबारात क्रिकेट खेळणाऱ्या युवकास छातीत गोळी लागून जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या युवकावर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सोमनाथ बाळासाहेब तांबे वय २१ रा. भेंडा ता. नेवासा असे या जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, भेंडा येथील सोमनाथ तांबे मित्रांसमवेत रविवारी रात्री भेंडा येथील एका मैदानावर क्रिकेट खेळत असताना रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांपैकी एका तरुणाने खेळत असलेल्या तरुणांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये सोमनाथ याला चुकून गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला. गोळीबार करून हल्ला करणारे तरुण पसार झाले.

दरम्यान या हल्ल्येखोराना इतर कोणाला तरी लक्ष करायचे होते मात्र खेळता खेळता सोमनाथ मध्ये आल्याने त्याला गोळी लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. नेवासा पोलीस ठाण्यात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक विजय करे यांचेशी संपर्क साधला असता जखमी सोमनाथ तांबे यांच्या जबाबावरून दोन संशियीताना ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Nevasa Bhenda youth was injured in the firing from the bike

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here