ऐन दिवाळीत तिघा मित्रांवर काळाचा घाला, बसने दुचाकीस्वाराला चिरडले
Buldhana News: खासगी बसने एका दुचाकीस्वाराला चिरडलेने आणि भर दिवाळीत अपघात (Accident).
बुलढाणा: एका खासगी बसने एका दुचाकीस्वाराला चिरडलेने आणि भर दिवाळीत अपघात घडला आहे. दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्ते अपघात व त्यावरील दुचाकीचे अपघाताचा प्रश्न येरणी वर आला आहे.
भरधाव खासगी बसने राष्ट्रीय महामार्गवर वडनेर भोलजी नजीक पुलाजवळ दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली. पंधरा दिवसांची दिवाळीची सुटी असल्याने ते शेगाव येथे दर्शनासाठी गेले असता त्यांचा अपघात झाला.
राष्ट्रीय महामार्गावर वडनेर गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर वडनेरजवळ खासगी बसने (Hr ०१ J ७७४१ ) दुचाकीला (MH ०५ bs ७८२१) धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वराड येथील गोपाल शालिक राणे (वय ३४ वर्षे जळगाव) शहरातील गिरणा कॉलनी येथील स्वप्निल भैया करणकार (वय २४ वर्षे) यांचा घटनासथळावर मृत्यू झाला. कल्याण येथील रहिवासी आकाश राजू आखाडे (वय ३० वर्षे) यांचा मलकापूर येथे रूग्णालयात जात असताना मृत्यू झाला.
अपघातात प्राण गमावलेल्या दोघांचे प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे तर तर तिसऱ्याचे मलकापूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत नांदुरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश जायले, ओम साई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोळकर, कृष्णा नालट, आश्विन फेरण, राजू बगाडे रुग्णवाहिकासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातातील मृतांना प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे आणले. स्वप्नीलचे दीड वर्षांपूर्वीच झाले लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या दीड वर्षातच स्वप्नीलचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: bike rider was crushed by a private bus and an accident occurred during Diwali
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App