Home जालना निर्दयी माता; प्रसूतीनंतर अर्भकाला फेकले गटारामध्ये, अनैतिक संबंधातून जन्मलेले अर्भक

निर्दयी माता; प्रसूतीनंतर अर्भकाला फेकले गटारामध्ये, अनैतिक संबंधातून जन्मलेले अर्भक

Jalana: निर्दयी मातेने अनैतिक संबंधातून जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक (infant) चक्क गटारीत फेकून दिल्याची घटना.

birth, the infant is thrown into the sewer, an infant born of an immoral relationship

वाटूर | जालना: एका निर्दयी मातेने अनैतिक संबंधातून जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक चक्क गटारीत फेकून दिले. ही घटना शनिवारी सकाळी (मोसा ता. परतूर) गावात उघडकीस आली. या प्रकरणात त्या निर्दयी मातेसह तिच्या आईविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोसा गावात शनिवारी सकाळी एका नाल्यात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. पोलिस उपनिरीक्षक नितिनी गट्टवार, पोलिस

हेडकॉन्स्टेबल दांडगे, शिंदे, चव्हाण यांनी गुप्त पद्धतीने या घटनेचा तपास केला. पोलिसांच्या तपासात गावातील एका घरात एका महिलेची प्रसूती झाल्याचे समोर आले.

पोलिसांना त्या घरात जाऊन तपासणी केली असता एक महिला प्रसूतीसाठी आईकडे आली होती. सदर महिला अनैतिक संबंधातून गर्भवती राहिली होती. तिची घरातच प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला नाल्यात फेकून देण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अर्भकाच्या शविच्छेदनानंतर उपसरपंच बद्रीनारायण खवणे, डॉ. गजानन केसरखाणे, बाबा शेख, कर्मचारी तय्यब पठाण, नितीन पाटोळे यांनी अर्भकावर पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले.

Web Title: birth, the infant is thrown into the sewer, an infant born of an immoral relationship

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here