Home पुणे भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन: BJP MLA Mukta Tilak Passed Away

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन: BJP MLA Mukta Tilak Passed Away

BJP MLA Mukta Tilak Passed Away:  पुण्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आहे.

BJP MLA Mukta Tilak Passed Away

पुणे: भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी आज, २२ डिसेंबर २०२२ ला दुपारी ३:३० वाजता अखेरचा श्वास घेतला.

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांचे निधन झाले आहे.

भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्या, पक्षादेशाला त्यांनी नेहमी प्रमाण मानून राजकीय जीवनात काम केलं. अगदी कर्करोगाशी झुंजत असताना त्यांनी व्हिलचेअर बसून मुंबईत येऊन मतदान केलं. कर्तव्यनिष्ठेला महत्त्व देणाऱ्या कार्यकर्त्या आज आमच्यातून गेल्या, अशा भावना पुणे भाजपचे पदाधिकारी करत आहेत.

मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत. मुक्ता टिळक यांनी २०१७ ते २०१९ या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले. त्या भाजपच्या पहिल्या महिला महापौर असल्याचीही माहिती आहे. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई आहेत. अर्थात बाळ गंगाधर टिळकांच्या त्या पणतसून आहेत.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: BJP MLA Mukta Tilak Passed Away

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here