Home नाशिक खळबळजनक! 19 वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थीनीचा मृतदेह आढळला; गळा आणि मानेवर जखमा

खळबळजनक! 19 वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थीनीचा मृतदेह आढळला; गळा आणि मानेवर जखमा

Breaking News | Nashik: १९ वर्षीय युवतीचा मृतदेह रासबिहारी लिंकरोड वरील एका मोकळ्या जागेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ.

Body of 19-year-old nursing student found

नाशिक : नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय युवतीचा मृतदेह रासबिहारी लिंकरोड वरील एका मोकळ्या जागेत मंगळवारी (ता.२३) सकाळी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. यामागे काही घातपात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  प्रियंका विरजी वसावे (वय १९, मु.पाटबारा, पो.जमाना, ता. अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार) असे मृत  विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रियांका सध्या औरंगाबाद नाक्यावरील एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.

मंगळवारी (ता.२३) रासबिहारी लिंकरोड वरील मिरद्वार लॉन्स शेजारी मोकळ्या जागेत सकाळी दहा वाजेच्या सुमारास येथून जाणाऱ्या एका जागृक नागरिकास युवती मृतावस्थेत आढळून आली.

याबाबत  माहिती तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर तात्काळ पंचवटी पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यावेळी दोरीने गळा आवळण्यात आल्याच्या खुणा, तसेच हाताला काही जखमा झाल्याचे प्राथमिक चौकशीत माहिती सूत्रांनी दिली आहे. यामागे घातपात असण्याची शक्यता असून, पोलिस या घटनेचा कसून शोध घेत आहेत. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Body of 19-year-old nursing student found

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here