Home पारनेर रुईचोंढा धबधब्यात बुडालेला तरुणाचा मृतदेह सापडला

रुईचोंढा धबधब्यात बुडालेला तरुणाचा मृतदेह सापडला

body of a young man drowned in Ruichonda waterfall was found

पारनेर | Parner: तालुक्यातील कर्जुले मांडओहळ धरणाजवळ असणाऱ्या रुईचोंढा धबधब्यात तरुण अंघोळ करत असताना धबधब्याजवळ खड्यात पडून बुडाला होता. ही घटना २५ ऑक्टोबरला घडली होती. त्याचा मृतदेह आज दुपारी पाण्यातून बाहेर येऊन तेथेच आढळून आला.

पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार, रुईचोंढा धबधबा येथे श्रेयस जामदार वय १८ रा. शिरूर व त्याचे मित्र पोहण्यासाठी आले होते. धबधबाच्या जवळ असलेल्या कुंडात श्रेयस जामदार हा अंघोळ करीत असताना पडला. आणि तो खोल पाण्यात बुडाला होता.

धबधबाच्या खाली असणारा खड्डा खोल असल्याने त्याचा मृतदेह कपारीला अडकण्याची शक्यात होती. त्या दृष्टीने पोलीस शोध घेत होते. काही अंतरावर मृतदेह अडविण्यासाठी झाडे व दोरखंड बांधण्यात आले होते. त्याचबरोबर पोलीस तेथे लक्ष ठेऊन होते.

आज दुपारी मृतदेह कुंडातून बाहेर आला. त्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना दिल्याने घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: The body of a young man drowned in Ruichonda waterfall was found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here