Home अहमदनगर खळबळजनक: नदीपात्रात आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

खळबळजनक: नदीपात्रात आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

body of an unknown man was found in a river

कोपरगाव: कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या पात्रात अंदाजे २७ वर्षीय पुरुष जातीचा अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला आहे.

रविवारी दिनांक ७ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ही बाब समोर आली आहे.

त्याच्या हातावर राजू असे नाव लिहिलेले आहे. शरीराने धडधाकट मजबूत, गोल चेहरा, सरळ नाक, सावळा वर्ण, बारीक दाढी, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाचा पट्टा असलेला व डाव्या बाजूला Ck असे इंग्रजीत नाव आहे, निळ्या रंगाची जीन्स आहे. तरी असे वर्णन असलेल्या व्यक्तीबद्दल कोणाला माहिती असल्यास कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन शहर पोलिसांनी केली आहे. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले (९८२३१०१७७८) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: body of an unknown man was found in a river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here