Home महाराष्ट्र बॉम्ब निकामी करताना स्फोट होऊन बॉम्ब शोधक पथकातील पोलीस कर्मचारी जखमी

बॉम्ब निकामी करताना स्फोट होऊन बॉम्ब शोधक पथकातील पोलीस कर्मचारी जखमी

bomb blast detonated, injuring a police officer

रायगड | Raygad: एका गुन्ह्यात जप्त केलेले बॉम्ब निकामी करताना त्याचा स्फोट होऊन दोन बॉम्ब (Bomb) शोधक पथकातील पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना महाड पोलीस ठाण्यात सायंकाळी घडली.

यावेळी रमेश कुटे आणि आशीर्वाद लदगे आण राहुल पाटील असे तीन कर्मचारी जखमी झाले आहेत,  दोघांना मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यामधील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत महाड पोलीस  पुढील तपास करीत आहेत.

महाड पोलिसांनी एका गुन्ह्यात गावठी बॉम्ब जप्त केले होते. हे जप्त केलेले बॉम्ब निकामी करण्यासाठी अलिबाग येथून बॉम्ब शोधक पथक महाड मध्ये गेले होते. यावेळी बॉम्ब निकामी करताना अचानक स्फोट होऊन मोठा आवाज झाला. या स्फोटात रमेश कुटे आणि आशीर्वाद लदगे हे दोघे जखमी झाले. जखमी पोलिसांना तातडीने महाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाच्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: bomb blast detonated, injuring a police officer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here