Home अहमदनगर अहमदनगर: पोहण्यास गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

अहमदनगर: पोहण्यास गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

Ahmednagar News:  भारजवाडी येथे विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Boy drowned in well while going swimming

पाथर्डी | Pathardi: तालुक्यातील भारजवाडी येथे विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या सुनील भाऊसाहेब खेडकर (वय १७, रा. भारजवाडी, ता. पाथर्डी) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ४) सकाळी घडली.

याबाबत माहिती अशी की, भारजवाडी येथील सुरेश कराड यांच्या विहिरीमध्ये पोहण्यासाठी सुनील खेडकर व त्याचे मित्र रविवारी सकाळी अकरा वाजता गेले होते. त्यावेळी सुनील व त्याचे सर्व मित्र विहिरीमध्ये पोहत होते. सर्व मित्र विहिरीतून बाहेर आले, मात्र सुनील आला नाही. त्यामुळे मित्रांनी त्याचा विहिरीमध्ये शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. मित्रांनी सुनील हा विहिरीत कुठेही दिसून येत नसून तो विहिरीत खाली गेला आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर गावातील लोक व नातेवाईकांनी सुनील खेडकर याचा विहिरीमध्ये शोध घेतला. बऱ्याच वेळाने सुनील विहिरीत सापडला. सुनील खेडकर याला दुपारी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. सुनील खेडकर याचा बारावीचा निकाल लागला होता. सुनीलचे आई- वडील हे गरीब कुटुंबातील असून, ते ऊस तोडणी कामगार आहेत.

Web Title: Boy drowned in well while going swimming

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here