Home अहमदनगर जिल्हा उपनिबंधकांच्या नावे मागितली साडेतीन लाखांची लाच, एजंट जेरबंद

जिल्हा उपनिबंधकांच्या नावे मागितली साडेतीन लाखांची लाच, एजंट जेरबंद

Bribe of Rs 3.5 lakh demanded in the name of District Deputy Registrar

Ahmednagar | अहमदनगर: जिल्हा उपनिबंधक यांच्या नावाने चार लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती साडेतीन लाख रूपये लाचेची (Bribe) रक्कम स्वीकारताना एका खासगी व्यक्तीला (एजंटला) नगर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

महेश गोविंद महांडुळे (वय 42 मुळ रा. रूईखेल ता. श्रीगोंदा, हल्ली रा. राजवर्धन बिल्डींग, फ्लॅट नंबर तीन, सारसनगर, अहमदनगर) असे जेरबंद केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील पुरूषाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. गुरूवार 21 एप्रिल रोजी लाच पडताळणी करण्यात आली. काल शुक्रवार 22 एप्रिल रोजी नगर शहरातील महात्मा फुले चौक येथील एका गाळ्यामध्ये लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. तक्रारदार यांनी त्यांचे गावातील भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सचिव यांचे विरूध्द केलेल्या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक यांनी सचिवास निलंबित केले होते.

सचिवास निलंबनातून मुक्त न करता सेवतून बडतर्फ करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून काढण्यासाठी जिल्हा उपनिबंधक यांचेशी ओळख आहे, असे सांगून त्यांच्या नावाने महांडुळे याने तक्रारदार यांच्याकडे चार लाख रूपये लाचेची (Bribe) मागणी केली.

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर 21 एप्रिल रोजी लाच मागणी पडताळणीमध्ये महांडुळे याने पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे चार लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती साडेतीन लाख रूपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. त्यावरून काल 22 एप्रिल रोजी नगर शहरातील महात्मा फुले चौकात एका गाळ्यामध्ये आयोजित केलेल्या लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान साडेतीन लाख रूपये लाच स्वीकारताना महांडुळे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

Web Title: Bribe of Rs 3.5 lakh demanded in the name of District Deputy Registrar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here