Home अहमदनगर लग्न करून घरात आलेली नवरी निघाली तृतीयपंथी -अहमदनगर घटना

लग्न करून घरात आलेली नवरी निघाली तृतीयपंथी -अहमदनगर घटना

a bride who came home after getting married is a third party

श्रीगोंदा | Shrigonda: हल्ली लग्नाळू मुलांना मुली मिळत नसल्याने बनावट लग्नाचे (Bride) रेकेट चालविणारे एजंट चांगलाच गैरफायदा घेत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील एका मुलाचा लग्न लावून देणाऱ्या महिला एजंटने चक्क तृतीयपंथी याशी विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

घरात लग्न लावून आणलेली नवी नवरी ही तृतीयपंथी असल्याचे समोर आल्याने मुलांच्या घरच्यांना धक्का बसला. याबाबत मुलाच्या घरच्यांनी त्या तृतीयपंथ्याला विचारणा केली तेव्हा त्याने त्यांना मारहाण केली.  हे प्रकरण थेट बेलवंडी पोलीसपर्यंत आले. लग्नासाठी एजंटने  घेतलेले पैसे  परत केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. या लग्नाची मात्र परिसरात चांगलीच चर्चा सुरु आहे. लग्न जुळवून देणाऱ्या एजंटने येळपणे येथील मुलाचे जालना येथील एका सुंदर तृतीयपंथाशी पैसे घेऊन लग्न जुळवून दिले. ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले. लग्नानंतर पूजा झाली. त्यानंतर नवरी ही मुलगी नव्हे तर तृतीयपंथी असल्याचे समोर आले. ही बाब समोर आल्याने घरच्यांना धक्काच बसला.  एजंट महिलेला सांगितल्यानंतर तिने कबुल करीत पैसे मागे दिले. दरम्यान हा तृतीयपंथी फरार झाला आहे.

Web Title: a bride who came home after getting married is a third party

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here