संगमनेर येथील मेव्हण्याने केले एका अल्पवयीन मेव्हणीचे अपहरण
Breaking News | Ahmednagar: मेव्हण्याने राहुरी येथील एका अल्पवयीन मेव्हणीचे अपहरण करून तीला पळवून नेल्याची घटना.
राहुरी: संगमनेर येथील मेव्हण्याने राहुरी येथील एका अल्पवयीन मेव्हणीचे अपहरण करून तीला पळवून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत मेव्हण्यावर अपहरणचा दाखल आला. गुन्हा करण्यात
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील १५ वर्षे १० महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तीच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील एका गावात राहते. पिडीत मुलीचा मावस मेव्हणा हा संगमनेर तालुक्यातील रहिवाशी असून तो सध्या राहुरी तालुक्यातील त्या गावात राहत आहे. रविवारी (दि.७) सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान पिडीत मुलगी कामावरुन घरी जाण्यासाठी तीचा मावस मेव्हणा रविंद्र बर्डे याच्या मोटरसायकलवर बसून गेली. तेव्हापासून ते दोघे बेपत्ता झाले. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी त्या दोघांचा परिसरात शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत. मुलीचे अपहरण करून तीला पळवून नेल्याची खात्री झाल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी रविंद्र भाऊसाहेब बर्डे (रा. कोंची, ता. संगमनेर) याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
Web Title: Brother-in-law kidnaps a minor sister-in-law
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study