Murder: भाऊबीजेला गेलेल्या भावाचा पतीकडून खून
Murder Case: पती पत्नीचे भांडण सोडवायला गेला अन पतीने पत्नीच्या भावाच्या गुप्तांगावर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना.
नांदेड: नांदेडमध्ये भाऊबीजेच्या दिवशी पतीने भावाचा खुन (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवणी किनवट तालुक्यातील जलधरा येथे रात्री ही घटना घडली. पती– पत्नीचे भांडण होत असताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पत्नीच्या भावाचाच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.
दिवाळी सणानंतर भाऊबीजेच्या दिवशी पती- पत्नीचे किरकोळ कारणावरून वाद सुरु झाला. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या बायकोच्या भावालाच तु आमचा वाद सोडवण्यासाठी का आलास म्हणुन गुप्तांगावर जबर मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत इस्लापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बाबुराव रामा झिगंरे आणि त्याची पत्नी यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण सुरु झाले होते. भांडणाचे रुपांतर मारामारीवर गेल्याने ऐन दिवाळी सणाच्या भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला मारहाण करत असलेल्या मेव्हण्यास रोखण्यासाठी गेलेल्या बेगाजी बरडे हा पती– पत्नीचा वाद सोडवण्यासाठी गेला.
आमचे दोघाचे वाद सोडवण्यासाठी तू का आलास? म्हणुन बाबुराव झिंगरे याने बेगाजी बरडे यांच्या गळ्यास पकडून गुडघ्याने त्याच्या गुप्तांगावर मारल्याने तो जागीच बेशुद्ध झाला. नातेवाईकांनी त्यास तातडीने जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्याची गंभीर परिस्थिती पाहून जलधरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी बेगाजी बरडे यांना पुढील उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथील डॉक्टरने त्याला मयत घोषित केले.
भाऊ रमेश बरडे याच्या फिर्यादीवरून बाबुराव रामा झिंगरे यांच्या विरुद्ध इस्लापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे हे करीत आहेत.
Web Title: Brother murder by husband
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App