Home क्राईम Murder: भावानेच केले भावावर चाकूने वार करीत हत्या

Murder: भावानेच केले भावावर चाकूने वार करीत हत्या

Parbhani Murder News: आईवर रुग्णालयात उपचार;  भावानेच केले भावावर चाकूने वार, परभणीतील घटना , किरकोळ वादातून झाला खून.

brother Murder his brother by stabbing him with a knife

परभणी : आईवर दवाखान्यात उपचार सुरू असताना घरी आलेल्या भावास तू इथे का आलास असे म्हणून विचारले असता किरकोळ वादातून सख्ख्या भावाने दुसऱ्या भावास गालावर चाकूने, काचेच्या ग्लासच्या तुकड्याने, कळशीने मारहाण करीत जखमी केले. यातच भावाचा जागेवर मृत्यू झाला. किरकोळ वादातून झालेली ही खुनाची घटना परभणीतील मराठवाडा प्लॉट भागात रविवारी उघडकीस आली.

परभणीत मराठवाडा प्लॉट परिसरात शनिवारी मध्यरात्री एक ते पहाटे पाचच्या दरम्यान ही घटना घडली. रामचंद्र कोंडिबा वाघमारे (रा. पोस्ट कॉलनी, दर्गा रोड) यांनी नानलपेठ ठाण्यात फिर्याद दिली. सतीश कोंडिबा वाघमारे (४३, रा. मराठवाडा प्लॉट) असे मयताचे नाव आहे. सुनील कोंडिबा वाघमारे (४९, रा. मराठवाडा प्लॉट) हे आरोपी भावाचे नाव आहे.

शकुंतलाबाई कोंडिबा वाघमारे (७५) या मराठवाडा प्लॉट भागात सुनील व सतीश या दोन मुलांसोबत राहतात. याशिवाय रामचंद्र हा मुलगा पोस्ट कॉलनीत राहतो. शकुंतलाबाई काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. शनिवारी मध्यरात्री सतीश यांनी भाऊ सुनील यास तू इथे का आलास, असे विचारले असता आरोपी सुनील याने सतीश याच्या गालावर ठोसा मारला तसेच चाकूने व फुटलेल्या काचेच्या ग्लासाने व त्याच्या तुकड्याने आणि कळशी मारून सतीश यास गंभीर जखमी केले. यात सतीश यांचा मृत्यू झाला. ही बाब रविवारी सकाळी उघडकीस आली. आरोपी भावास पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: brother Murder his brother by stabbing him with a knife

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here