Home अकोले राजूरच्या डांगी जनावरांच्या प्रदर्शनात येथील वळू ठरला चैम्पियन

राजूरच्या डांगी जनावरांच्या प्रदर्शनात येथील वळू ठरला चैम्पियन

Breaking News | Akole: नगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यातील डांगी तसेच देशी-विदेशी जनावरे या प्रदर्शनात खरेदी- विक्रीसाठी.

bull from here became the champion in the Dangi cattle exhibition of Rajur

राजूर:अकोले तालुक्यातील राजूर येथे देशी-विदेशी जनावरांचे व कृषी मालाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे व सौ. पुष्पाताई लहामटे यांच्या हस्ते करण्यात आले.

सलग ४ वर्षे हे प्रदर्शन बंद असल्याने शेतकऱ्यांच्या सर्जा राजाच्या खरेदी विक्री बरोबरच कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. यावर्षी नगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यातील डांगी तसेच देशी-विदेशी जनावरे या प्रदर्शनात खरेदी- विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणली आहेत. येथील खंडोबाची टेकडी लहान-मोठ्याা हजारो जनावरांनी फुलून गेली आहे. खरेदी विक्रीसाठी व्यापारी वर्गही मोठ्या संख्येने दाखल झालेला आहे. राजूर येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात राजूर ग्रामपंचायत, पंचायत समिती, आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डांगी आणि देशी विदेशी जनावरांचे व कृषी प्रदर्शन भरत असते. या प्रदर्शनात शेतीमालाचे तसेच अवजारांची अनेक स्टॉल मांडण्यात आली होती. या चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनास सर्व शेतकरी बांधवांनी भेट देऊन शेती बाबत माहिती घ्यावी, असे आवाहन सरपंच पुष्पाताई निगळे यांनी केले. सलग चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात हजारो नागरिक आपली उपस्थिती लावत आहेत. यावर्षी वेगवेगळ्या तालुक्यातील ९८ शेतकऱ्यांनी आपली डांगी जनावरे प्रदर्शनात उतरवली आहेत. प्रदर्शनास आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड यांनी सोमवारी दुपारी भेट दिली. यावर्षी सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असल्याने व प्रदर्शन भरविण्यात आल्याने शेतकरी व व्यापारी वर्गात मोठे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

या प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातील धामणी (ता. इगतपुरी) येथील भाऊसाहेब कचरु भोसले यांचा वळू, चैम्पियन ठरला. अकोले तालुक्यातील सांगवी येथील धोंडीया किसन दिन्नर यांचा वळू, उपविजेता ठरला. तसेच बाळू लोटे (वारघुशी, ता. अकोले) यांचा दोन दाती वळ, भाऊसाहेब भोसले (धामणी ता. इगतपुरी) यांचा चार दाती, नारायण जाधव (पाडळी, ता. सिन्नर) यांचा सहा दाती वक, तर आठ दाती प्रकारात विठ्ठल गंभीरे (गंभीरवाडी, ता. अकोले) यांच्चा वळू आणि शेरनखेल येथील भागवत कासार यांची गाभण गाय हे विविध गटातील प्रथम कमांकाचे विजेते ठरले.

Web Title: bull from here became the champion in the Dangi cattle exhibition of Rajur

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here