Home अहमदनगर Theft: सराफाचे दुकान फोडले, दागिने लंपास

Theft: सराफाचे दुकान फोडले, दागिने लंपास

bullion shop was blown up, the jewelery theft

राहुरी | Theft:  राहुरी तालुक्यातील मानोरी येथील एका सराफाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे १६  हजार रूपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.  

याबाबत अधिक माहिती अशी की,मानोरी येथील राहुरी- मांजरी रस्त्याच्या लगत असलेल्या रेणुका माता शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील अनिल डहाळे यांचे सौभाग्य अलंकार या दुकानाचे आज पहाटे अज्ञात चोरट्यांनी टामीच्या साह्याने शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करत  दुकानातील अंदाजे १६  हजार रु. किमतीचे  सोन्या-चांदीचा किरकोळ दागिने लंपास केले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.

पोलिस पाटील भाऊराव आढाव यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.  या ठिकाणी पो.हेड.महेंद्र गुंजाळ यांनी भेट देऊन अधिक माहिती घेतली आहे. राहुरी शहरासह तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून चोरीच्या (theft) घटना घडत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: bullion shop was blown up, the jewelery theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here