Home अहमदनगर पेट्रोल पंपावर मध्यरात्री चोरट्यांची धाडसी चोरी, लाखोंची रोकड लंपास

पेट्रोल पंपावर मध्यरात्री चोरट्यांची धाडसी चोरी, लाखोंची रोकड लंपास

burglary at a petrol pump in the middle of the night

Ahmednagar News Live | पाथर्डी | Pathardi: पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील गंगाबाबा पेट्रोल पंपावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी (burglary) केल्याची घटना घडली आहे. यामध्ये 4 लाख 90 हजार 470 रुपयाची रोकड चोरून नेली आहे. हा प्रकार करीत असताना तिघेजण सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा राजेंद्र ढाकणे यांच्या मालकीचा या परिसरात गंगा बाबा पेट्रोल पंप आहे. रात्री बारा वाजेच्या सुमारास पंपावरील कामगार पेट्रपलपंप बंद करून रात्री बारा वाजता झोपले होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास तेथील कार्यालयाच्या खिडकीतून चोरटे आत शिरले. त्यांनी कार्यालयात कप्यात ठेवलेले 4 लाख 90 हजार 470 रुपयांची रोकड ड्रावर उचकटून चोरुन नेले. आवाज आल्याने कामगार विठ्ठल खेडकर जागे झाले. तेव्हा त्यांनी तिघांना पसार होताना पाहिले. संशयित आरोपींमध्ये जवळच्याच दुर्गादेवी तांड्यावरील एकजण सहभागी असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

तांड्यावरील हा युवक यापुर्वी शेवगाव येथे चोरीच्या गुन्ह्यात अटक होता. तो सराईत असल्याची माहीती पोलिसांकडून मिळत आहे. पोलिस उपअधिक्षक आण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. श्वानपथक व ठसे तज्ञांना बोलविले होते. संशयीताचे नाव समजल्याने त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र तो फरार असल्याचे समजते.

Web Title: burglary at a petrol pump in the middle of the night

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here