Home बुलढाणा समृद्धीवर मध्यरात्री बर्निंग ट्रकचा थरार, केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग

समृद्धीवर मध्यरात्री बर्निंग ट्रकचा थरार, केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग

केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग (Fire), बर्निंग ट्रकचा थरार.

burning truck at midnight on Samriddhi, heavy fire in a truck carrying chemicals

बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका केमिकल टँकरचा भीषण अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आग लागताच चालकाने खाली उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे. परंतु, ट्रक जळून खाक झाला आहे. परिणामी समृद्धी महामार्गावरील वाहतूक खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नजीक ही घटना घडली आहे. ट्रकला आग लागण्याच्या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं आहे.

अधिक माहिती अशी की,  नाशिकहून नागपूरच्या दिशेने केमिकलची वाहतूक करत असलेल्या भरधाव ट्रकला मध्यरात्री अचानक आग लागली. बुलढाण्याजवळील मेहकर जवळ ही घटना घडली असून आग लागल्याची घटना समजताच चालकाने खाली उडी मारली. त्यामुळं ड्रायव्हरचा जीव वाचला असून ट्रक आगीत जळून भस्मसात झाला आहे. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नसली तरी ट्रकमधील संपूर्ण केमिकल जळून खाक झाले आहे.

Web Title: burning truck at midnight on Samriddhi, heavy fire in a truck carrying chemicals

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here