Home Accident News प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, ३ जणांचा मृत्यू; ३६ गंभीर जखमी

प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, ३ जणांचा मृत्यू; ३६ गंभीर जखमी

Breaking News | Amravati Bus Collapsed: बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू.

Bus full of passengers falls into valley, 3 dead 36 seriously injured

अमरावती: अमरावती मधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यतील चिखदाराजवळ बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमरावतीमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अमरावतीच्या चिखलदराजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस परतवाडा सेमाडोह घटांग रस्त्यावरुन जात असताना घाटात वळणाच्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दरीत कोसळली.

या अपघातात दोन महिला व एक बालक अशा तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३६ प्रवासी गंभीर जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Bus full of passengers falls into valley, 3 dead 36 seriously injured

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here