Home पुणे खळबळजनक: व्यावसायिक महिलेची दुकानात शिरून गळा चिरून हत्या

खळबळजनक: व्यावसायिक महिलेची दुकानात शिरून गळा चिरून हत्या

Pune Murder Case: कापड विक्रेती दुकानदार महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या.

business woman was murder by entering the shop and slitting her throat

पुणे: दुकानात सकाळच्या वेळी साफसफाई करत असलेल्या कापड विक्रेती दुकानदार महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी दहा ते सव्वादहा वाजताच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथे घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पूजा ब्रिजकिशोर प्रसाद (३१, रा. लांडगे आळी, भोसरी, मूळ रा. नवादा, ता. जि. मुजफ्फरपूर, बिहार) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती ब्रिजकिशोर शिवचंद्र प्रसाद ( ३८) यांनी याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा प्रसाद यांचे लांडेवाडी येथे कपड्यांचे दुकान आहे. मागील काही वर्षांपासून हे कुटुंब शहरात वास्तव्यास आहे. पूजा यांनी मंगळवारी सकाळी त्यांचे दुकान उघडले. दुकानात त्या साफसफाईचे काम करत होत्या. त्या वेळी एक अज्ञात दुकानात आला. त्याने धारदार शस्त्राने पूजा यांच्या गळ्यावर वार केले. यामध्ये पूजा गंभीर जखमी झाल्या, दरम्यान, पूजा यांची आरोपीसोबत झटापट झाली. त्या दुकानाच्या बाहेर येत असताना जमिनीवर कोसळल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूजा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे, परिमंडळ एकचे उपआयुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे, प्रशांत अमृतकर व वरिष्ठांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: business woman was murder by entering the shop and slitting her throat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here