Home क्राईम व्यावसायिकाची हत्या, बॉडीसह पोत्यात दगड भरुन विहिरीत फेकलं, मग…

व्यावसायिकाची हत्या, बॉडीसह पोत्यात दगड भरुन विहिरीत फेकलं, मग…

Pune Crime: व्यावसायिक वर्चस्वाचा वाद आणि बदनामी केल्याचा राग मनात धरून तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा लोखंडी रॉड डोक्यात घालून खून (Murder) केल्याची घटना.

businessman was Murder, a sack was filled with stones along with the body and thrown into a well

जुन्नर: जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिक वर्चस्वाचा वाद आणि बदनामी केल्याचा राग मनात धरून तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा लोखंडी रॉड डोक्यात घालून खून केल्याची घटना समोर आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकून दिल्याचे समोर आलेआहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे हा प्रकार घडला आहे.

किशोर तांबे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते बेल्हे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक होते. या प्रकरणात पोलिसांनी पांडुरंग जिजाबा तांबे (वय ३९ वर्ष) व महेश गोरकनाथ कसाळ (वय ३० वर्ष) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत किशोर तांबे हरवल्याची तक्रार चुलत भाऊ संतोष तांबे यांनी आळेफाटा पोलिसात दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपींनी किशोर तांबे यांना दारू पिण्याच्या बहाण्याने शेतात बोलावले. दारू पिताना आरोपी आणि तांबे यांच्यात वादावादीस सुरुवात झाली. मुरूम व्यवसायात असलेल्या स्पर्धेमुळे आमची बदनामी करतो का? या गोष्टीचा राग आरोपींच्या मनात घर करून होता. त्यातूनच आरोपी पांडुरंग तांबे याने मित्राच्या मदतीने किशोर यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यातच तांबे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी तो मृतदेह पोत्यात भरला आणि तो पाण्यावर तरंगू नये म्हणून त्यात दगड भरले. हा मृतदेह विहिरीत फेकून दिला होता.

पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत परिसराची कसून तपासणी केल्यानंतर त्यांना मृतदेह तिथून जवळच असलेल्या विहिरीत आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली.

Web Title: businessman was Murder, a sack was filled with stones along with the body and thrown into a well

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here