संगमनेर तालुक्यात सरपंचाच्या घरासमोरून १४ लाख रुपयांचे केबल बंडल लंपास
Ahmednagar | Sangamner Theft: निमोण येथे 14 लाख 17 हजार 416 रुपयांचे आरमार्ड केबलचे बंडल सोमवार दिनांक 2 जानेवारी मध्यरात्री चोरुन नेल्याची घटना, गुन्हा दाखल.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील निमोण येथे 14 लाख 17 हजार 416 रुपयांचे आरमार्ड केबलचे बंडल सोमवार दिनांक 2 जानेवारी मध्यरात्री चोरुन नेले. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी तिघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निमोण येथील विद्यमान सरपंच संदीप भास्कर देशमुख यांच्या घरासमोरून स्कॉर्पिओ वाहनातून अक्षय संजय जाधव (वय 24, बालमटाकळी, ता. शेवगाव) (संशियीत आरोपी) व त्याच्या इतर दोन साथीदारांनी 14 लाख 17 हजार 416 रुपयांचे आरमार्ड केबलचे बंडल चोरुन नेले.
Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा
याप्रकरणी संदीप भास्कर देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तिघांवर पोलिसांनी भादंवि कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय खंडीझोड हे करत आहे.
Web Title: cable bundle worth Rs. 14 lakh was theft in front of the Sarpanch’s house
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App