Home गडचिरोली ‘कॉलगर्ल’ हनी ट्रॅप : सरकारी अभियंता अडकला, मागितले १० लाख

‘कॉलगर्ल’ हनी ट्रॅप : सरकारी अभियंता अडकला, मागितले १० लाख

Breaking News: सहायक अभियंत्याला ‘कॉलगर्ल’च्या माध्यमातून ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार.

Callgirl' Honey Trap Government Engineer Trapped, Demands 10 Lakhs

गडचिरोली: येथील एका सहायक अभियंत्याला ‘कॉलगर्ल’च्या माध्यमातून ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून १० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार २९ जानेवारीला उजेडात आला. नागपुरातील एका पत्रकार, पोलिस अंमलदारासह चौघांना गडचिरोली गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका –  Education Portal 

 गडचिरोली येथे एक सहायक अभियंता कार्यरत आहेत. ४ डिसेंबर २०२३ रोजी नागपुरात एका कॉल गर्लसोबत ते एका हॉटेलमध्ये गेले होते. या कॉल गर्लने नंतर ही माहिती तिच्या ओळखीचा कथित पत्रकार रविकांत कांबळे यास दिली. त्याने अभियंत्याला बलात्काराच्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत १० लाख रुपयांची खंडणी मागितली, तर पोलिस अंमलदार सुशील गवई हा देखील हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीसाठी काम करायचा, त्यानेही १० लाखांची मागणी केली. महिनाभरापासून आरोपींनी अभियंत्याकडे पैशासाठी तगादा लावला होता. यामुळे अभियंत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली.

Web Title: Callgirl’ Honey Trap Government Engineer Trapped, Demands 10 Lakhs

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here