संगमनेर नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटात कारचा भीषण अपघात
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात पुणे नाशिक महामार्गावर कारचे टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. हा अपघात रविवारी घडला.
या अपघातात श्रीरामपूर येथील वाहन चालक नितीन कोळगे हे थोडक्यात बाचावले आहे. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
संगमनेर येथून पुणे नाशिक महामार्गावर ही वाहन जात असताना अचानक कारचे टायर फुटल्याने चालक कोळगे यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार साईड पट्टीवर जाऊन आदळल्याने हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
कारचे टायर फुटल्याने महामार्गावर भीषण अपघात सातत्याने होत असल्याने नागरिकांनी गाडीचे काळजी घेणे आवश्यक आहे.
Web Title: Car accident in Chandanapuri Ghat on Sangamner Nashik Highway