Home अहमदनगर पुणे -अहमदनगर महामार्गावर कारचा भीषण अपघात, कुटुंबातील पाच जण जागीच ठार Accident

पुणे -अहमदनगर महामार्गावर कारचा भीषण अपघात, कुटुंबातील पाच जण जागीच ठार Accident

Pune Ahmednagar highway Accident: उलट दिशेने आलेल्या ट्रकने कारला धडक दिल्याने पुणे-अहमदनगर महामार्गावर  रांजणगावजवळ भीषण अपघात.

car accident on Pune Ahmednagar highway, five members of a family were killed 

पुणे: चुकीच्या म्हणजेच उलट दिशेने आलेल्या ट्रकने कारला धडक दिल्याने पुणे-अहमदनगर महामार्गावर  रांजणगावजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  एक जण जखमी झाला आहे. हा अपघात रांजणगावजवळ झाला आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला असून ठार झालेल्यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. आज पहाटे हा अपघात झाला.

महामार्गावर चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकने कारला समोरुनच जोरदार धडक दिली, ही धडक इतकी भयानक होती की, कारमधील समोर बसलेले कारमध्येच अडकून पडले होते. अपघातानंतर घटनास्थळी क्रेन आणून कार आणि ट्रक वेगवेगळे करण्यात आले. मृत्यू झाले सर्व प्रवासी पनवेल येथे जाण्यासाठी  निघाले होते.

काही काळानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. पुणे-अहमदनगर महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला, चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकने पनवेलकडे निघालेल्या कारला समोरुन जोरदार धडक दिली, ही धडक इतकी भयानक होती की, कारचा समोरील भागाचा चेंदामेंदा झाला होता.

या अपघातात संजय भाऊसाहेब म्हस्के (वय ५३), राम भाऊसाहेब म्हस्के (वय ४५), राजू राम म्हस्के (वय ७ वर्षे), हर्षदा राम म्हस्के (वय ४ वर्षे), विशाल संजय म्हस्के (वय.१६वर्षे) असे मयत झालेल्या व्यक्तींची नावे असून साधना राम म्हस्के (वय ३५) या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील सर्व आवाने बुद्रुक (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) येथील रहिवासी आहेत.

Web Title: car accident on Pune Ahmednagar highway, five members of a family were killed 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here