Home संगमनेर Accident | संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर कार दुचाकीचा अपघात, कार पलटी  

Accident | संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर कार दुचाकीचा अपघात, कार पलटी  

Sangamner Accident:  कारने दुचाकीस्वाराला उडवून दुभाजाक्वर जाऊन पलटी झाली.

Car two-wheeler accident on Nashik Pune highway

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे. रविवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास कार व दुचाकीत धडक होऊन एक जण जखमी झाला आहे. तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंडी फाटा येथे हा अपघात  (Accident) झाला.

याबाबत मिळालेली  माहिती अशी की, किसन मार्तंड बहीरट हे त्यांच्या दुचाकीवरून बोटयाच्या दिशेने चालले होते व ते कुरकुंडी फाट्यावर रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकाजवळ उभे होते त्याच दरम्यान बोटयाकडून विनायक कैलास घाटकर हे त्यांच्या ताब्यातील कार (क्रमांक एम एच ०४इ एच ८५९६) हीच्या तून घारगांवच्या दिशेने जात होते. त्यांचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट दुचाकीस्वाराला उडवून त्यांची कार दुभाजकावर जाऊन पलटी झाली.यात दुचाकीस्वार बहीरट हे जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती समजताच घारगांव पोलीस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख, संतोष फड यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघात ग्रस्त वाहणे बाजूला घेतले व जखमीला खासगी रुग्णवाहिकेतून घारगांव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Car two-wheeler accident on Nashik Pune highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here