Home संगमनेर संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर मालवाहू टेम्पोचा अपघात, एक ठार- Accident

संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर मालवाहू टेम्पोचा अपघात, एक ठार- Accident

Ahmednagar | Sangamner Accident:  टेम्पोची अज्ञात वाहनाला धडक, टेम्पो चालक ठार.

Cargo tempo accident on Pune Nashik highway, one killed

संगमनेर: संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव येथे मालवाहू टेम्पोने अज्ञात वाहनास धडक दिल्याने टेम्पोचालकाचा मृत्यू झाल्याची घटना काल पहाटे घडली आहे. तर अपघातात टेम्पोचा पुढील बाजूचा चक्काचूर झाला आहे. रामजतन मुन्नन सरोज (वय 42, रा. उत्तर प्रदेश) असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  मालवाहू टेम्पो हा संगमनेर कडून आळेफाट्याच्या दिशेने जात होता. सोमवारी पहाटे टेम्पो घारगाव शिवारातील हॉटेल लक्ष्मी जवळ आला असता त्याच दरम्यान या टेम्पोचा अपघात झाला आहे. अपघात झाल्याचे समजताच घारगाव पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार राजू खेडकर, पोलीस नामदेव बिरे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त टेम्पोतून चालकाला बाहेर काढत रुग्णवाहिकेतून संगमनेरला पाठवले होते.

तर डोळासणे महामार्गाचे सुनिल साळवे, उमेश गव्हाणे, नंदकुमार बर्डै, योगीराज सोणवने यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती दरम्यान या अपघातात मालवाहू टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून समोरचे वाहन नेमके कोणते होते ते मात्र समजू शकले नाही.

Web Title: Cargo tempo accident on Pune Nashik highway, one killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here