मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोलमाफीबाबत मोठी घोषणा
Mumbai | मुंबई: पंढपूर येथे आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या अनुषंगाने वारकऱ्यांच्या सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.
या बैठकीत मुख्य सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही मुख्य सचिवांना दिले आहेत.
Web Title: Chief Minister Eknath Shinde’s big announcement regarding toll exemption