Home पुणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ, न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ, न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

CM Eknath Shinde:  एकनाथ शिेदे यांच्या निवडणूक शपथपत्रात गोलमाल असल्याचा आरोप.

Chief Minister Eknath Shinde's difficulty increased, court orders inquiry

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याबाद्धाल याचिका दाखल केली होती. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास यांनी कोर्टात याचिका दाखल केली. न्यायालयाने याची दखल घेत याप्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली असल्याचा आरोप या याचिकेत केला आहे. या याचिकेची दखल आता न्यायालयाने घेतली आहे.

एकनाथ शिंदे  यांनी सन २००९, २०१४ ला १४७, कोपरी पाचपाखाडी विधानसभा निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्रा सोबत शपथपत्र सादर केले आहे. त्यानंतर त्यांनी २०१९ ला १४७, कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्रा सोबत शपथपत्र सादर केले. एकनाथ शिंदे यांनी सन २०१४ व २०१९ मध्ये निवडणुकीकरीता दिलेल्या नामनिर्देशनमध्ये अनेक तफावती दिसून येत असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढणार का?याबाबत वेळच ठरवेल.

Web Title: Chief Minister Eknath Shinde’s difficulty increased, court orders inquiry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here