Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! दोन्ही गटांची नावे ठरली- निवडणूक आयोग  

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! दोन्ही गटांची नावे ठरली- निवडणूक आयोग  

Cm Eknath Shinde: शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले.

CM Eknath Shinde and Thackeray names of both the groups were decided

मुंबई: निवडणूक आयोगाकडून मिळालेली आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. आज निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे गटाला कोणतंही चिन्ह देण्यात आलं नाही. मात्र, शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले आहे. तर उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव मिळालं आहे. तर उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे.

निवडणूक आयोगाने आता उद्धव ठाकरे  यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिलं आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव तर उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांच्या नावाचा वाद मिटला असला तरी शिंदे यांच्या गटाच्या चिन्हाचा वाद मिटला नाही.

शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे त्रिशुल, उगवता सुर्य आणि गदा ही चिन्ह मिळावी अशी मागणी केली होती. तर ठाकरे गटाने त्रिशुल, उगवता सुर्य, गदा आणि मशाल हे चिन्ह सादर केले होते. त्यानुसार आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटाची धार्मिक चिन्ह रद्द केली आहेत.

त्यामुळं शिंदे गटाचं गदा हे चिन्ह रद्द केलं जाणार आहे. तर दुसरीकडे दोन्ही गटांनी त्रिशुल आणि उगवता सुर्य हे चिन्ह सादर केली होती ही चिन्ह सारखीच असल्यामुले ही चिन्ह रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे मशाल हे चिन्ह ठाकरे गटाला मिळालं आहे. तर शिंदे गटाला चिन्हासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे. आता पुढे कोणते चिन्ह मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: CM Eknath Shinde and Thackeray names of both the groups were decided

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here