Home महाराष्ट्र CM Eknath Shinde: शिंदे फडवणीस मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्मुला ठरला, असे असणार...

CM Eknath Shinde: शिंदे फडवणीस मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्मुला ठरला, असे असणार मंत्रिपद

CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांना 17 ते 18 मंत्रीपदं तर भाजपला 25 ते 26 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता विश्वासनीय सूत्रांनी दिली माहिती.

CM Eknath Shinde Fadanvis

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा सवाल वारंवार  विरोधकांकडून विचारण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंबंधीत एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये अनेक बैठक पार पडल्या आहेत. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आता मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.

यात शिंदे गटाला जास्त मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिपद वाटपात 50-50 समीकरण आखण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. यात एकनाथ शिंदे यांना 17 ते 18 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहेत. तर भाजपला 25 ते 26 मंत्रीपदं मिळणार अशी शक्यता विश्वासनीय सूत्रांनी वर्तवली आहे. तसेच अपक्ष आमदारांना आपापल्या कोट्यातून मंत्री मंडळात स्थान मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

मंत्रिमंडळ विस्तारासाठी दोन किंवा तीन ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. कारण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारचा सुप्रीम फैसला सुप्रीम कोर्टात एक ऑगस्टला होणार आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरती एक ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. त्यानंतरच याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो असेही सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे या निर्णयाचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही. आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे आमचे मंत्रिमंडळ कायदेशीर असणार आहे. असा दावा शिंदे गटांकडून करण्यात येतोय. तर हे सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाही असल्याचा दावा ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय. त्यामुळे या सुनावणीवरही बरेच काही अवलंबून असणार आहे.

Web Title: CM Eknath Shinde Fadanvis became the formula for allotment of the cabinet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here