Home महाराष्ट्र मोठी बातमी! शिंदे – फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय

मोठी बातमी! शिंदे – फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय

CM Eknath Shinde:  शिंदे – फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नैसर्गिक आपत्तीतून नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शिंदे- फडणवीस सरकारने मोठा निर्णय.

CM Eknath Shinde government took 'this' big decision in the cabinet meeting

मुंबई: शिंदे – फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नैसर्गिक आपत्तीतून नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शिंदे- फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान हे आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित केले जाणार आहे. या निर्णयामुळे अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारकडून राज्यात अवकाळी पाऊस झाल्यास त्यातून होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्यात अडचण निर्माण होत होत्या. त्यामुळे यावर महत्वाचा निर्णय आज राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला. यामध्ये अवकाळी पाऊस हा आता नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरण्यास मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणे आता शक्य होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. यापुढे सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाणार आहे. 10 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सलग पाच दिवस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाणार आहे. हा राज्य सरकारचा शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचा सर्वात मोठा निर्णय आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  होते.

मंत्रिमंडळात घेण्यात आलेले निर्णय :

1) शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित

2) ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद

3) नागपूर मेट्रो रेल टप्पा- 2 प्रकल्पास सुधारित मान्यता. 43.80 किमीचा मेट्रो मार्ग उभारणार

4) देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल

5) सेलर इन्स्टिट्यूट ‘सागर’ भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण

6) महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी.

7) अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता

8) नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता ‘परिस स्पर्श’ योजना

Web Title: CM Eknath Shinde government took ‘this’ big decision in the cabinet meeting

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here