Home Accident News संगमनेर दुर्दैवी घटना: ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू

संगमनेर दुर्दैवी घटना: ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू

Sangamner Accident: ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असणारी युवतीचा मृत्यू.

College girl dies after being found under sugarcane tractor Accident

संगमनेर: संगमनेर शहरातील जुन्या पोस्ट ऑफिस जवळ ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असणारी युवतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वैष्णवी साहेबराव गुंजाळ रा. गुंजाळवाडी या १९ वर्षीय असे या अपघातात मृत्त्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.

वैष्णवी गुंजाळ ही आपल्या स्कुटी वरून जात असताना जुन्या पोस्ट ऑफिस जवळ ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून हा अपघात घडला.  संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात वैष्णवी द्वितीय वर्षात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती.

वैष्णवी अपघातात मयत झाल्याची माहिती समजतात नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेने गुंजाळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा केला जाणार असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी दिली.

उसाची वाहतूक होत असलेल्या ट्रॅक्टरला जोडलेल्या दोन ट्रॉलीखाली सापडून दुचाकीने घरी जाणाऱ्या १९ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. १६) संध्याकाळी ७ ते साडेसात वाजेच्या सुमारास शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक-पुणे महामार्गावर जुन्या पोस्ट ऑफिससमोर घडला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
वैष्णवी साहेबराव गुंजाळ (वय १९, रा. निर्मलनगर, गुंजाळवाडी, ता. संगमनेर  युवतीचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, वैष्णवी गुंजाळ ही नवघर गल्ली परिसरातून दुचाकीवर घरी जात होती. तेथून काही अंतर पुढे गेल्यानंतर उसाची वाहतूक होत असलेल्या ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडलेल्या होत्या.
हे वाहन रस्त्याने जात होते. त्याखाली वैष्णवी गुंजाळ सापडली. तिच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने मोठा रक्तस्त्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी शहर पोलिसांना कळविले. पोलिस उपनिरीक्षक विजय परदेशी हे पोलिस कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी दाखल झाले. तिचा मृतदेह कुटीर रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आला.

Web Title: College girl dies after being found under sugarcane tractor Accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here