Ahmednagar: कॉलेज तरुणीला फूस लावून पळवून (abducted) नेण्याचा प्रकार.
श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातून 12वीत शिक्षण घेत असणाऱ्या कॉलेज तरुणीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत या मुलीच्या वडिलानी पोलिसांत फिर्याद दि, ल्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील वॉर्ड नं. 6 परिसरातील ही अल्पवयीन मुलगी दि. 18 नोव्हेंबर रोजी रात्री आई-वडिलांसोबत जेवण करून सर्वजण रात्री 9.30 च्या सुमारास झोपले होते. पहाटे 4 च्या सुमारास या मुलीची मोठी बहीण उठली असता तिला शेजारी झोपलेली लहान बहीण दिसली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला असता सदर अल्पवयीन मुलगी सापडली नाही.
याबाबत अज्ञात इसमाने आमच्या राहत्या घरातून या मुलीस फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली. त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला असून श्रीरामपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दररोज करू शकता १ हजार ते १५ हजार रुपयांची कमाई ते ही घरबसल्या ऑनलाईन | Earn Money Online
Web Title: college girl was seduced and abducted
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App