Home अकोले या ‘कारणामुळे’ आ. डॉ. किरण लहामटे हे अजित पवारांच्या गटात दाखल

या ‘कारणामुळे’ आ. डॉ. किरण लहामटे हे अजित पवारांच्या गटात दाखल

Akole News: आमदार डॉ. किरण लहामटे यांनी भावनेपेक्षा विकासाला प्राधान्य देत उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) यांना साथ देण्याचे निश्चित केले.

come to Dr. Kiran Lahamte joined Ajit Pawar's group

अकोले : तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी भावनेपेक्षा विकासाला प्राधान्य देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देण्याचे निश्चित केले असून आपली भूमिका स्पष्ट केली.

तालुक्यातील विकासकामांविषयी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी चर्चा केली. उपजिल्हा रुग्णालय, लघु औद्योगिक वसाहत, तोल्हार खिंड आहे. घाटनदेवी घाट रस्ता, २०० दशलक्ष घनफूट क्षमतेचे लोअर आंबित, बितका, तालुक्यातील रस्त्यांसाठी निधी हे प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द मिळाल्यानंतर पुन्हा आमदार तालुक्यात जनतेत फिरले आणि बुधवारी अजित पवार यांनाच पाठिंबा जाहीर केला.

आ. डॉ. किरण लहामटे यांनी प्रथम अजित पवार यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यांच्या शपथविधीलाही ते उपस्थित होते. मात्र अकोलेत आल्यानंतर कार्यकर्ते व लोकांची मते जाणून घेतली.व ’यु टर्न’ घेत शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला. अकोल्याच्या जनतेचा कौल मान्य करीत आपण शरद पवार यांचेसोबत शेवटपर्यंत त्यांची सोबत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्यांनी पुन्हा ‘ यु टर्न’ घेतला. त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्ते व लोकांत त्यांच्या वारंवार बदलणार्‍या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मुंबईत जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.तालुक्यातील विकास कामांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यानंतर पुन्हा तालुक्यातील लोकांशी चर्चा करूनच आपण अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी घोषित केले होते.

बुधवारी त्यांनी अकोले बसस्थानक व अगस्ति कारखाना रोडची प्रमुख पदाधिकारी व अधिकारी यांचे समवेत पाहणी केली. तालुक्यातील रस्ते व विकासाची कामे होणार असेल तर अजित पवार यांच्या बरोबर जा, काहीजण शरद पवार यांच्यासोबत राहिले पाहिजे, परंतु शेवटी सर्वांनीच तुमची फसवणूक होणार नाही, एवढा सर्व निधी मिळणार असेल तर तुम्ही अजित पवार यांच्या सोबत गेले पाहिजे, अशी भूमिका घेतल्याने शेवटी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: come to Dr. Kiran Lahamte joined Ajit Pawar’s group

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here